jump to navigation

जुन्या पुस्तकांचा सदुपयोग जुलै 25, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , , ,
trackback

आपल्या जवळची, आपल्या आप्त मित्रांची जुनी, जादा पुस्तके चांगल्या ठिकाणी जेथे त्याचा योग्य उपयोग होईल. (उदा. शहरातील झोपडपट्टीत किंवा ग्रामीण भागातील ग्रंथालये, शाळा, वसतिगॄहे, मंदिरे) अशा ठिकाणी सुरक्षित, सहज व हमखासपणे जावी, असे वाटत असल्यास कॄपया संपर्क करा.

(सध्या अभ्यासाची पुस्तके, मासिकांचे अंक नको)

सहयोग प्रतिष्ठान

२४, योगक्षेम लेआऊट,

स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर

मो. ९२२५२१०१३०

आपल्यासारख्यांच्या सहकार्याने सहयोग प्रतिष्ठानने आतापर्यंत दीड वर्षात सुमारे ३५०० पुस्तके अशा गरजू संस्थापर्यंत पोहचवली आहेत.

सहयोग प्रतिष्ठानचे ग्रंथ पुनरउपयोगाचे कार्य आपल्या ठिकाणी करु इच्छिणार्र्या सर्व जागॄत, सक्रीय सज्जनांचे स्वागत आहे.

सूचना/शंका/प्रतिक्रिया याचेही स्वागत आहे.

प्रतिक्रिया »

1. granthasampada - जुलै 28, 2008

धार्मिक पुस्तके नि:शुल्क उपलब्ध
आपला हा उपक्रम अति उत्तम आहे अभिनंदन. आपल्या व्यासपीठावर आम्ही हे आवाहन करतो.
महाराष्ट्रात कुठेही खास धार्मिक पुस्तकांचे वाचनालय चालवित असलेल्या किंवा चालवू इच्छिणारे मंदिरे/देवस्थाने/ट्रस्ट/सार्वजनिक संस्था यांना नि:शुल्क देण्याकरिता जुनी/नवी धार्मिक पुस्तके उपलब्ध आहेत. अशा संस्था/व्यक्तींनी संपर्क करावा.
मंदिर समन्वय समिती, नागपूर
anilsambare@gmail.com